Ad will apear here
Next
२० हजार भावांना ओवाळणार २० हजार बहिणी
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे २९ ऑक्टोबरला नाशिकमध्ये कार्यक्रम


नाशिक :
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या प्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने यंदा भाऊबीजेदिवशी नाशिकमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या दिवशी वीस हजार बहिणी वीस हजार भावांना औक्षण करणार आहेत. तपोवनमध्ये २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. 

त्या कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांचा सत्संग, श्री गणेश होम, अष्टलक्ष्मी होम आदी कार्यक्रमांसह भाऊबीज दीपावली मिलन कार्यक्रम होणार आहे. त्यातच वीस हजार भावांना वीस हजार बहिणी औक्षण करणार असल्याची माहिती मुख्य समन्वयक विजय हाके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

‘नाशिक शहरात असा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. या कार्यक्रमाला धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान लाभणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीत हा कार्यक्रम होणार असल्यामुळे सबंध जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे सदस्य या कार्यक्रमात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होणार आहेत नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी आरक्षित असणाऱ्या तपोवनातील जागेवर हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी नागरिकांना उपस्थित राहण्यासाठी नाशिक शहरात जनजागृती केली जात आहे. याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ही होऊ शकते,’ असे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे सांगण्यात आले. 

‘‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी नाशिकमध्ये यावे अशी अनेक दिवसांपासूनची अपेक्षा या निमित्ताने पूर्ण होणार असून, या सोहळ्यास दीड ते दोन लाख लोकांची उपस्थिती असेल. हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडक साधकांसाठी ‘श्री श्रीं’चा सत्संग होणार आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ही विज्ञानवादी चळवळ असून, व्यक्तीने समाजात वावरताना सकारात्मक विचारसरणीने वावरायला हवे. कुटुंबाबरोबरच राष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे, अशी शिकवण संस्थेतर्फे दिली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, त्या २० एकर क्षेत्राच्या मैदानात हा सोहळा होणार असून, त्यासाठी १०० बाय ८० फुटांचे भव्य स्टेज उभारले आहे. या ठिकाणी प्रशासकीय बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी सहभागी होण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात येत आहे,’ असे हाके यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSPCF
Similar Posts
सावरकर सेवा संस्थेतर्फे ठाण्यात २८ ऑक्टोबरला ‘दिवाळी पहाट’ ठाणे : ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’ या दिमाखदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
१९, २० ऑक्टोबरला पुण्यात भगवद्गीतेवरील आंतरराष्ट्रीय परिषद पुणे : इंटरनॅशनल गीता फाउंडेशन ट्रस्ट, म्हैसूर येथील अवधूत दत्तपीठम् आणि पुण्यातील भारतीय विद्या भवन या संस्थांच्या वतीने पुण्यात १७व्या ‘ग्लोबल गीता कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद १९ आणि २० ऑक्टोबर रोजी पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनात होणार आहे.
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर २६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language